रुस युक्रेन युद्धाला वर्ष होत आले आहे. युद्ध सुरु झाले त्यावेळेस युरोपीय देशांनी रुस वर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले. तरीही युद्धाला पूर्ण विराम मिळाला नाही. अमेरिकेने सुद्धा रुस वर अनेक प्रतिबंध लावले. पण युद्ध थांबण्याचे नाव घेईना. परंतु भारताने दोन्ही देशांशी मध्यस्ती करत युद्ध थांबवण्याचेआवाहन केले. परंतु भारताने रुस वर प्रतिबंध न लादता रुस कडून तेल आयात करणे चालूच ठेवले आहे.
पाश्चात्य देशांच्या दबावाखणी न येता रूसी तेलाची आयात भारत करत असल्याने काही देशांनी भारतावर निर्बंध लावण्याची मागणी अमेरिकेकडे केली. यावर अमेरिकेचे सहायक विदेश मंत्री करेन डोनफ्राइड यांनी बुधवारी एक स्टेटमेंट दिले , त्यात त्यांनी असे सांगितले कि रुस कडून तेल आयात वरून भारतावर प्रतिबंध लावण्याचा आमचा विचार नाही. कारण भारताबरोबर असलेले संबंध महत्वपूर्ण आहेत.
Tags:
International