आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन !
प्रतिक बनकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष श्रीगोंदा तालुका यांनी आमच्या न्यूज चैनल प्रमुखाशी बोलताना अशी माहिती दिली की, महाभकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींमध्ये अत्यंत संतप्त भावना आहेत. आरक्षणाचं हे न्यायालयीन पातळीवर लढलं जात असताना केवळ राज्य सरकारने प्रभावी बाजू न मांडल्याने आणि केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे हे आरक्षण गेले.
ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे
प्रतिक बनकर
(भाजपा ओबीसी उपाध्यक्ष श्रीगोंदा तालुका)