सैराट | Romantic love stories in marathi


सैराट |  जिवाची हेळसांड आन ती विचित्र दुनिया | Prem Bhangi #sairat Part 1



इथ माझी घरची परिस्थिती साधीसुधी....पन अभ्यासात जेमतेम हुशार...

हुशार नाय म्हणता येणार... पन असत्यत असली साळत एक दोन टाळकी... ज्यांची गाडी मधूनच चालती...ती पन शेवट पर्यंत😄धडप्रगती चांगली नाय आनधड खराबय नाय......

 मी बऱ्या मार्कांनी दहावी पास झालो, सायन्सला जायचं होत 😓पुढ काय कराव डोक चालना.. म्हणून अकरावी बारावीला कॉमर्स नी प्रवेश घेतला....

आणि माझ्या आयुष्याची खरी भानगड सुरु झाली... मला शिक्षणातल बऱ्यापैकी जमत होत बर का... पन पोरींच्या बाबतीत मी जरा कच्चाच होतो....

 हो नाही..... हो नाही करता करता अकरावीच वर्ष संपल.....

तो दिवस होता बारावीच्या प्रथम चाचणी परीक्षेचा....... मला चांगल आठवतंय त्यादिवशी मी बऱ्यापैकी चांगले धुतलेले कपडे घालून गेलतो... अगदी नटून थटून म्हणल तरी चालेल... (पेपरला कोण नटून थटून जातंय😜)

 गेलो बो एकदाचा कॉलेजला पेपरची वेळ झाली होती.... पाणीबीनी प्यायलो..... पेन-पट्टी घेऊन मित्रांसोबत परीक्षा हाॅल हुडकत हुडकत निघालो....

        एकदाचा वर्ग सापडला....वर्गात पोरपोरी होत्या..आकरावीच्या आन माझ्या वर्गातल्या बारावीच्या....पन अजून काय मास्तर प्यापर घेऊन आल नव्हत. वर्गात दाबात एन्ट्री मारली😜.....(कसलं दाबात....काहीपण) बैठक क्रमांकाचा शोध सुरु झाला. दरवाज्याच्या बाजूला असलेल्या लाईनीन आपलं वजवज नंबर शोधत शोधत पार खालच्या कोपऱ्यात गेलो.... आन तेवढ्यात दुसऱ्या कोपऱ्यातून मित्रान हाक मारली...... आर आन्या इकडच्या लायनीला तुझा नमबार हाय.... इकड ये!!!!....(ते पन हसून आन डोळा मारून.....कदाचित त्याला कसली तरी चाहूल लागली होती.... मित्र मंजे जरा हरामीच असत्यात) परीक्षेची वेळ झाली होती. (माझ्या मते शेवटून तीन नंबरच्या बाकावर माझा नंबर होता)



म्हणून मी धावत(चालत 🏃) बाकाच्या दिशेनी गेलो.... बघतो तर काय😲

        दिसायला सुंदर.... जशी नव्याने उमललेली कळीच.....काळे बुरे केस असणारी.....रंगानी मध्यम...काळसर गुलाबी ओठ....आन तिचे नाजूक मनमोहक डोळे..... जिवाला वेड लावणारे ...उंचीन साधारण पाचीईकफुट.... माझ्या खांद्या पर्यंत आसन... पहिल्याच नजरेत तिच्या चेहऱ्यावरची चमक माझ्या मनात भरली....तिच्या विचारात मी कधी लेखक झालो मला कळलच नाही. या सगळ्या प्रसंगात मला तिच्या स्वभावातील साधेपणा चांगलाच जाणवत होता.

आज तिचा देखील पेपर होता. ती अकरावीला आणि मी बारावीला.....(तशी आमची जोडी भारीच होती जसे सीता आणि राम😘)

        मी आपलं लाजकाज बाकावर बसलो... आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुली शेजारी बसून पेपर देण्याची संधी मिळाली... काही येळानी मास्तर वर्गात प्यापर घेऊन आलं.. प्यापराला सुरवात झाली. आम्ही दोघे पन पेपर लिहित होतो.  तिला.... तुझ नाव काय ? असं विचारायची हिम्मत पन नवती... आणि महत्वाची गोष्ट अशी की मला मुलींशी कसं? काय ? बोलाव अनुभव नाही...माझं लक्ष्य माझ्या प्यापरात कमी आणि तिच्याच प्यापरात जास्त होत. अथक प्रयत्न करून एकदाच तीच नाव दिसलं आन मन अधीर झालं..

मी मनातल्या मनात म्हंटल.....अरे वा! मयुरी....😍 किती छान नाव आहे.

        तिचं लिखाण काम चालू असताना मी हळूच तिच्याकड बघत होतो. मनातलं वादळ काय शांत होत नवत. डोस्क्यात वेगवेगळे विचार  चालू असताना पेपर कधी संपला कळल देखील नाही. असं वाटत होत परीक्षा कधीच संपू नये. नेहमीच तिच्या सोबत रहाव. एकदाची चाचणी परीक्षा संपली... नेहमी प्रमाणे कॉलेज चालू झाल. पण मी तिला विसरलो नव्हतो.

        कधी नजरेस पडण?..... जीव पार कासावीस व्हायचा...कधी कधी असं वाटायचं ती जणू माझी जीवन संगिनीच (बाईको😍) आहे... जीव ओवाळून टाकला म्हणजे त्या व्यक्तीसाठी अहोरात्र झटाव लागत. असचं काहीस झालं होत माझं.

        पेपर होऊन दोन-च्यार दिवस झाले होते. त्यादिवशी माझ्या आयुष्यात वेगळ काहीतरी घडणार होत. आमच्या वर्गाच्या पाठीमागच्या बाजूला सायन्स विभागाची लॅब होती  आणि लॅबच्या समोरच त्यालाच खेटून पंधरा-वीस फुट अंतरावर आमचा कॉमर्सचा वर्ग. महत्वाचे म्हणजे दोन्ही वर्गांच्या खिडक्या अगदी समोरासमोर होत्या. नेहमी प्रमाणे दुपारच्या सुट्टीत कॅन्टीनला चहा वडापाव खाऊन मित्रांसोबत वर्गात आलो.सुट्टी संपली होती. त्यादिवशी नेमक आमच मराठीच लेक्चर होत पन मास्तर काय आल नव्हत.. पोर धिंगाणा घालत होती. माझं लक्ष्य सहज पाठीमागच्या खिडकीत गेल. लॅबमध्ये मयुरी होती आमची नजरानजर झाली आन उत्सुकतेच्या भरात माझा उजवा हात कधी तिला हाय करू लागला कळलच नाही. तिच्या सुंदर निरागस चेहऱ्यावर पहिल्यांदाच हसू बघितलं. तो अनुभव खूपच भारी होता. मी तिला कधीच विसरू शकत नाही.



         सगळ काही अचानक घडत होत. ती कुठ राहत असेल माहित नवत पन...आज तिचा पाठलाग केला. कॉलेज सुटल्यावर ती मैत्रिणी सोबत घरी जात असतना एसटी स्टॅन्डच्या पाठीमाघ असणाऱ्या तिच्या घराच्या कंपाऊंड वरून उडी मारून जात होती.... त्यावेळेस तिचं अलगद लक्ष्य माझ्याकड गेल...तिच्या नजरेचा घाव थेट माझ्या हृदयावर झाला...आन तिच्या चेहऱ्यावर नाजूक हसू उमटलं...जणू गुलाबाची ताजी कळीच उमलत आहे. मला देखील हसू आल. तेंव्हा पासून येताजाता माझं लक्ष्य तिच्या घराकड नेहमी असायचं......अजूनही आहे

 तिच्या मनात देखील माझ्या बद्दल भावना निर्माण  झाल्या असतील.. हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होत. मग काय सुरू झाली आमची रोजची नजरानजर.... ती माझ्याकड बघायची मी तिच्याकड बघायचो....... भारी वाटायचंराव.... आमच असं बरेच दिवस चालूच होत. बारावीच्या बोर्डाच्या प्यापराला मयुरी कॉलेजच्या पोर्च मधी भेटली... बेस्ट ऑफ लक.. देखील बोलली... आन लाजून पटकन निघून गेली(ती लाजली का मी.....काळालच नाय😂)पेपर नंतर चार महिने माझी नजर तिला शोधत होती. तिचा चेहरा डोळ्यांसमोरून हटतचं नव्हता. तिला फेसबुक, इंस्टाग्राम वर शोधलं.  त्यावेळी तिचं आडनाव  माहित नव्हतं. नाहीतर  त्याच  वेळी आमची  सूत्र जुळली  असती.  कुठून  तरी  बोलायला  सुरुवात  झाली  असती. असो  शेवटी नशीबच !

        कदाचित तो जून-जुलैचा महिना असावा. कॉलेज रोडला माझ्या भावानी नवीनच दुकान सुरु केलं होत. योगायोग असा की दुकान लगत  एक हॉटेल होतं... मयुरी तिच्या  मैत्रिणी  सोबत हॉटेल मध्ये चहा पाण्याला येत असे. तिच्याकडं  बघून  तिला  भेटायची खूप इच्छा होत होती. कॉलेज भरताना आन सुटताना रोज मी तिला पाहत असे. पन कधी कधी असं वाटायचं ती मला स्वीकारील कि नाही याच विचारात खचून जात असे. मला अनेकदा असं जाणवलं कि तिचं सुद्धा मन माझ्यात रमलाय. पन नंतर नंतर अस वाटलं ती माझा तिरस्कार करत आहे... एवढे दिवस एकमेकांकडे बघत होतो मी एकदा पण प्रपोझ केल नाही.इच्छा तर होती आन भीती देखील वाटत होती. मी  तीच  मन  जिंकलं  होत  तर प्रपोझ  करायला  काहीच  हरकत  नव्हती . हे तर साहजिकच आहे असा येडेपणा केला तर कोणतीही मुलगी नाराज होईलच.

या गोष्टीला सहा-सात वर्ष होऊन गेले. याकाळात अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.असं वाटलं आता वेळ निघून गेली आहे. बोलून काहीच उपयोग होणार नाही.

आणि या सगळ्यात आमच प्रेम अबोल राहिलं..............



सैराट २ | जिवाची हेळसांड आन ती विचित्र दुनिया | Prem Bhangi #Sairat2
Also Like:

Love stories in marathi
romantic love stories in marathi
love stories in marathi books
love stories in marathi pratilipi

Post a Comment

Previous Post Next Post