ब्रिटन मध्ये आढळला कोरानाचा दुसरा घातक प्रकार | हवाई वाहतूक बंद
अशी माहिती मिळत आहे की, कोरोनासारखाच नवीन घातक व्हायरस ब्रिटन मध्ये आढळून आला आहे. हा व्हायरस आवाक्या बाहेरचा आहे असे दिसून आल्याने ब्रिटन मध्ये ये-जा करणारी सर्व विमाने युरोपीय संघाने बंद केली आहेत.
नवी दिल्ली: कोरोना
व्हायरस चा नवीन प्रकार समोर आल्याने आरोग्य मंत्रालायावरील तणाव वाढत असल्याचे
दिसून येत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी ज्वाइंट मोनिटरिंग ग्रुप ची
बैठक बोलावली आहे.कोरोनासारखाच नवीन घातक व्हायरस ब्रिटन मध्ये आढळून आला आहे. हा
व्हायरस आवाक्या बाहेरचा आहे असे दिसून आल्याने ब्रिटन मध्ये ये-जा करणारी सर्व
विमाने युरोपीय संघाने बंद केली आहेत. ब्रिटन मध्ये कडक लॉकडाऊन केले गेले आहे.
या नवीन कोरोना व्ह्यरास चा जगावर काय परिणाम
होईल ? हा व्हायरस किती घातक आहे? याबद्दल अजून कोणतीही खास माहिती उपलब्ध नाही.
तरी आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.