मुलगी एकटी असताना या सात इसमांनी चाकूचा धाक दाखवून या अल्पवयीन मुलीवर......
नाशिक: नाशिक मध्ये बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरून गेले आहे.नाशिक शहर परिसरातील अरिंगळे मळ्यातील एका १३ वर्षीय मुलीवर सात अज्ञात इसमांनी बलत्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी एकटी असताना या सात इसमांनी चाकूचा धाक दाखवून या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पिडीतेच्या आईने या घटनेची तक्रार दिली असूनया घटनेतील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकमधील घटना : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार