इंडोनेशियाच्या दक्षिण भागातील सुलावेसी द्वीपावरील गुहेमध्ये या पेंटिंगचा शोध लागला.
इंडोनेशिया: इंडोनेशियात पुरातन गुहांचा शोध चालू असताना एका गुहेत डुकराची सर्वात जुनी Painting सापडली आहे.(world most oldest painting) शास्राज्ञांचा असा दावा आहे की ही चित्रकाला तब्बल ४५ हजार वर्ष जुनी आहे.
(Indonesia) इंडोनेशियाच्या दक्षिण भागातील सुलावेसी द्वीपावरील गुहेमध्ये या पेंटिंग चा शोध लागला. मनुष्य पृथ्वीवरती किती वर्षापासून अस्तित्वात आहे याचा अंदाज या पेंटीग वरून लावला जाऊ शकतो.
शास्रज्ञानी अशी माहिती दिली आहे की या गुहेचा दरवाजा चुनखडी सारख्या दगडांनी बंद झाला होता. परंतु वातावरणातील होणाऱ्या बदलावामुळे गुहेत जाणारा रस्त्यातील खडक ढासळून छोटासा रस्ता तयार झाला.त्यामुळे या गुहेच अस्तित्व समोर आले.
तसेच त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता या गुहे बद्दल तेथील स्थानिक जमाती बगीस यांना गुहे संदर्भात माहिती नसल्याचे स्पष्ट झाले.
(टीप: ही बातमी See24News कडून संपादित केलेली नाही)