अण्णा हजारे दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांसाठी अमरण उपोषण करणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी कधीही अण्णा उपोषणास बसू शकतात.
पुणे:सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे यांनी शेतकरी बांधवांच्या हितासाठी अमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत निर्णय त्यांनी लेखी पत्रा द्वारे गुरवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवला आहे. पत्रकार सभेत बोलताना हजारे म्हणाले, " मी जानेवारी महिन्याच्या शेवटी दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांसाठी अमरण उपोषण करणार आहे." उपोषणची तारीख त्यांनी स्पष्ट केली नसून या महिन्यात कधीही ते उपोषणास बसू शकतात.
अण्णा हजारे कोण आहे. | Who Is Anna Hajare?
जन्म १५ जून १९९७, अण्णा हजारे याचं संपूर्ण नाव किसान बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे असे आहे.त्यांचा जन्म अहमदनगर येथील भिंगार या गावी झाला आहे. त्यांचे मूळ गाव हे पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी हे आहे. ते एक भारतीय सैनिक आहे. ते एक सैनिकी वाहनचालक होते. त्यांना आज महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक समाजोपयोगी कार्य केली आहेत. अण्णा हजारे यांनी आज पर्यंत १५ उपोषणे केली असून सर्व यशस्वी ठरली आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक आंदोलने चळवळी तसेच दारुबंदी अशा प्रकारची अनेक समाज हिताची कार्य त्यांनी केली. आणि ते यापुढे ही करत राहणार आहेत.