लग्न मंडपातच नवरदेवाचा मृत्यू

चालू लग्न सोहळ्यात तीव्र हृद्यविकाराच्या झटक्यामुळे गमवावा लागला जीव.  दोन्ही वधू-वर कुटुंबावर पसरले दुखाचे सावट.



कर्जत: चालू लग्न सोहळ्यात तीव्र हृद्यविकाराच्या झटक्यामुळे नवरदेवाला जीव गमवावा लागला. दोन्ही वधू-वर कुटुंबावर पसरले दुखाचे सावट पसरले आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील चिलवडी या ठिकाणी घडली आहे. विवेक जगताप असे या नवरदेवाचे नाव असून ते रा.भूम जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांचा विवाह चिलवडी येथील दिलीप राऊत यांच्या मुलशी होता. दुपारी एकच्या सुमारास मंगलाष्टके चालू असतानाचे नवरदेवाला चक्कर आली आणि नवरदेव जमिनीवर कोसळला. लग्न सोहळ्यातील कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. नवरदेवाला तातडीने राशीन येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तो पर्यंत नवरदेवाचा मृत्यू झाला होता.

शवविश्छेद्न केले असता नवरदेवाचा मृत्यू हृद्य विकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

Previous Post Next Post