अमेरिकेतील मॉल मध्ये गोळीबार, आठ नागरिक गंभीर जखमी

शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेत मॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेले आठ व्यक्ती जखमी झाले आहेत.






वाशिंग्टन: अमेरिकेतील विस्कोन्सिन राज्यातील ववातोसा मधील मिल्वाैैकी जवळ असणाऱ्या मेटफेयर मॉल मध्ये शुक्रवारी ही घटना घडली. पोलीस त्या अज्ञात हल्लाखोरांच्या शोधात आहेत. या गोळीबारीमध्ये मॉल मधील आठ लोक गंभीर जखमी झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचण्य आगोदरच अज्ञात हल्लाखोर फरार झाले होते. तरी पोलीस त्यांच्या शोधात आहेत. पोलिसांच्या माहिती नुसार जखमी व्यक्तीमध्ये एक लहान मुलगा असून सात तरुण आहेत. त्यांना नजीक च्या हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले असून त्यांची परिस्थिती चिंताजनक नाही असे स्थानिक वृत्तसंस्थे कडुन समजले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post