या कारणास्तव जपानवरील हल्ला हा अमेरिकेवरील हल्ला समजण्यात येईल.?
जगभरातील अनेक देश कोरोना संकटाशी सामना करत
असताना चीनने विस्तारवादी धोरणाचा अवलंबले असल्याचे दिसून येत आहे.चीनने दक्षिण
चीन समुद्रात असणाऱ्या इतर देशांना धमकी देण्यास सुरवात केली होती. लडाखमध्ये भारत
चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती निर्माण
झाली आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे चीन आणि जपान मध्ये वाद सुरु झाला असून
युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व मिळवण्यासाठी
चीनने इतर शेजारच्या देशांवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
जपानच्या संरक्षणाची जबाबदारी जपान आणि अमेरिकेत
१९५१ मध्ये झालेल्या करारानुसार अमेरिकेची आहे. या कारणास्तव जपानवरील हल्ला हा
अमेरिकेवरील हल्ला समजण्यात येईल. चीनने लष्करी कारवाई केल्यास अमेरिकन फौजाही या
युद्धात उतरतील. परिणामी तिसरे महायुद्ध सुरू होण्याची भीती तज्ञ व्यक्त करत आहेत.