फडणवीस यांनी श्री.छ.उदयनराजेंच्या उमेदवारीचा आग्रह धरला. आणि मग.
फडणवीस यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीचा आग्रह धरला. आणि मग. भाजप पक्षातर्फे श्री.छ. उदयनराजे भोसले हे राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाले आहे. येत्या दोन एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही खबर आहे. श्री.छ. उदयनराजे भोसले हे छ. शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने त्यांनाच केंद्रात पाठवावे जेणेकरून पक्षाचा राज्यात चांगलाच प्रभाव वाढेल.
उमेदवारी कोणासाठी द्यायची हे ठरविण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, श्री. छ. उदयनराजे भोसले, हे सर्व मिटिंग साठी उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.छ.उदयनराजेंच्या उमेदवारीचा आग्रह धरला. या आग्रहा खातीर भाजपतर्फे त्यांची उमेदवारीही निश्चित केली.
Tags:
Maharashtra