आपल्याच पक्षातील गद्दारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार तडीपार.
आपल्याच पक्षातील गद्दारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार तडीपार. औरंगाबादमधील कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान बरीच काही महत्वाची माहिती विषयी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आता आपल्याला धडाडीने काम करायचे आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
त्याचबरोबर राजसाहेबांनी पक्षात काही गद्दार असल्याचा सुद्धा उल्लेख केला. हे गद्दार चुकीची माहिती पसरवित असल्याचा आरोप त्यांनी केला. दोनच दिवसात त्यांची हकालपट्टी करण्यात येईल असेही ते म्हणाले. बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आपण आंदोलन केले आहे, त्यात भर म्हणून काही अफगाणी सुद्धा हाती लागल्याचे त्यांनी सांगितले.
Tags:
Political