व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी चक्क शिक्षक-शिक्षिकेचे चाळे मुलांनी पहिले आणि मग...
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी चक्क शिक्षक-शिक्षिकेचे चाळे मुलांनी पहिले आणि मग...व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी राहुरीतील एका शाळेतच शिक्षक व शिक्षिका यांना प्रेम चाळे करताना मुलांनी पहिले. आता मुलांनी पहिले म्हटल्यावर गावभर भोबाटा तर होणारच.
दुपारच्या सुट्टीत हे शिक्षक व शिक्षिका एका वर्गात प्रेम चाळे करत असल्याचे मुलांनी पहिले. दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत ती गोष्ट वेगळी परंतु दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मुलांना बाहेर सोडून आत दोघे युगुल चाळे करत व्हॅलेंटाईन डेचा आनंद घेत होते. काही मुलांनी हा प्रकार पहिला व तो गावातील काही प्रतिष्ठीत लोकांपर्यंत पोहोचला. तसेच मुलांनी त्यांच्या पालकांना सुद्धा शाळेतील गमतीशीर प्रकार अगदी रंगवून सांगितला.
मग काय लहान मुलांसमोर असा प्रकार घडत असल्याचे पाहून पालक व काही गावातील मंडळी शाळेत पोहोचली. व शाळेला टाळे लावले. हि माहिती नगरसेवकापर्यंत गेली. नगरसेवकांनी शाळेत येऊन पोलिसांच्या मध्यस्थीने टाळे उघडून शाळा पुर्वव्रत चालू केली. घडलेल्या प्रकरणावरून संतप्त ग्रामस्त या मुख्यध्यापाकाना दोष देत आहेत. मुख्याध्यापकांवर दुर्लक्ष केल्याचा ठपका गावकर्यांनी दिलाच. या दोन्ही प्रेम युगुलांची तातडीने बदली सुद्धा करण्यात आली आहे.
Tags:
Entertainment