सरकारी कर्मचाऱ्यांचा ५ दिवसाचा आठवडा मग पगार ७ दिवसाचा का ? बच्चू कडू.
सरकारी कर्मचाऱ्यांचा ५ दिवसाचा आठवडा मग पगार ७ दिवसाचा का ? बच्चू कडू. महाविकास आघाडीसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेतलेला असतानाच बच्चू कडू यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. कर्मचार्यांनी ५ दिवस कामावर हजेरी लावायची आणि मग पगार ७ दिवसांचा का द्यायचा ?
आधीच ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. यात कर्मचाऱ्यांचे पगार भरमसाठ केले आहेत. आणि त्यात परत कामाचे दिवस सुद्धा कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जो कर्मचारी खरोखर मन लाऊन काम करतो त्याच्यासाठी ४ दिवसांचाच आठवडा करा असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.