कपडे चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा ! विवाहितेचा व्हिडिओ...
कपडे चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा ! विवाहितेचा व्हिडिओ... विवाहित महिला अंधेरीतील शेजवान हुसेन यांच्या टेलरिंग च्या दुकानात कपडे शिवण्यासाठी आली. २ फेब्रुवारी रोजी या टेलरकडे कपडे शिवण्यासाठी दिले व रविवारी कपडे घेण्यसाठी महिला दुकानात गेली. त्यावेळी दुकानदार शेजवान हुसेन याने महिलेला ड्रेस घालून पाहण्यास सांगितले.
महिला कपडे चेंज करण्यासाठी ट्रायल रूम मध्ये गेली. कपडे बदलून झाल्यानंतर त्या विवाहितेची नजर तिथल्या एका पिशवीकडे गेली. तिने पिशवी उचकून पहिली असता त्यात एक मोबाईल सापडला. त्या मोबाईल मध्ये तिचा व्हिडीओ निघत होता. मोबाईल पाहिल्यानंतर तिचा कपडे बदलताणाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हुसेन ला विचारले असता तो टाळाटाळ करू लागला.
त्यानंतर या महिलेने तीच्या घरच्यांना कळवले. घरच्यांनी येऊन या दुकानदाराला ओशिवरा पोलीस ठाण्यात नेले. व त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Tags:
Crime