आता भाजपने घेतला हा निर्णय, पुढची निवडणूक भाजपच जिंकणार
आता भाजपने घेतला हा निर्णय, पुढची निवडणूक भाजपच जिंकणार. दिल्लीतील पराभवा नंतर आता भाजप काही कठोर पाऊले उचलणार असल्याचे समजते. भाजप आता केंद्रातील काही योजना घरोघरी पोहचवणार आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो.
आम आदमी पक्षाने जशी विकासकामे, योजना लोकांपर्यंत पोहचून दिल्लीत सत्ता मिळविली तसीच कामे आता भाजपा सुद्धा करू शकते. लोक कल्याणकरी योजना राबविण्याचे आदेश केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्र्यांना दिले आहेत. त्याच बरोबर ह्या योजना सामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील याचे प्रयत्न करण्याचे देखील आदेश दिले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर देखील करण्यात यावा असा आदेश संबंधित अधिकार्यांना दिला असल्याचे समजते.