म्हणून रोहित पवारांना कोर्टाचे समन्स.
म्हणून रोहित पवारांना कोर्टाचे समन्स. रोहित पवार यांना कोर्टाने समन्स बजावले आहे.भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या प्रचारपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. राम शिंदे यांनी सोसिअल मीडियात बदनामी केल्याचा आरोप हायकोर्टात लावला आहे. तसेच कोर्टाने रोहित पवारांना समन्स बजावले आहे. परंतु रोहित पवार यांनी समन्स माझ्या पर्यंत आले नसल्याचे सांगितले आहे.निवडणुकीत पराभव सुद्धा स्वीकारावा , पचवावा लागतो. लोकांनी निवडणुकीत माझ्या बाजूने कौल दिल्याने मी निवडून आलो. आता निवडून आलो आहे तर लोकांची कामे करावीच लागणार. या कोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. जनतेचे जो पर्यंत माझ्यावर प्रेम विश्वास आहे तो पर्यंत मला कशाचीही भीती नाही असेही ते म्हणाले.
Tags:
Political