एकतर्फी प्रेमातून मुलीनेच केले मुलावर ब्लेडने वार
एकतर्फी प्रेमातून मुलीनेच केले मुलावर ब्लेडने वार. पोलिसांकडून हाती आलेल्या माहिती नुसार, हि मुलगी व मुलगा उत्तर प्रदेशातील हफिगंज परीसारातील एकाच कॉलेज आणि एकाच वर्गात शिक्षण घेत होते. दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे एकमेकांशी चांगलीच ओळख होती. दोघांमध्ये मैत्रीचे नाते हि होते.
मुलगा दिसायला सुंदर असल्यामुळे मुलगी वर्गात शिकत असताना सारखी टक लाऊन त्या मुलाकडे बघायची. तिच्या ह्या अश्या वागण्याची कल्पना मुलालाही होती. पण त्याने काही त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. मुलीचे या मुलावरती एकतर्फी प्रेमच झाले होते. पण मुलगा त्या मुलीकडे फक्त एक मैत्रिण या नात्यानेच पह होता.
या मुलीनेच शेवटी धाडस करून मुलाला प्रपोज सुद्धा केल. परंतु मुलाने लगेचच नकार सुद्धा दिला. मुलीने वारंवार प्रपोज केल , लग्न करण्याच आश्वासनही दिल. पण मुलाच्या मनात हि मुलगी काय बसेना. त्याने तिला नकाच दिला.
प्रपोज करून सुद्धा हा मुलगा नकारच देतो यामुळे हि मुलगी खूपच संतापली. रागाच्या भरात तिने कॉलेजच्या बाहेर ह्या मुलाला अडवले आणि ब्लेडने मुलाच्या चेहऱ्यावरच वार केले. मुलगा रक्तभंबाळ होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला इस्पितळात दाखलाही केले.
मुलाच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलीला अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल न करता फक्त समज दिली.
Tags:
Crime
