महाविकासआघाडी सरकार मध्ये उडाली वादाची ठिणगी ? कॉंग्रेस आवाज उठवणार ?
विरोधक आधीच महाविकास आघाडी वर जोरदार टीका व विरोध करत आहेत. भाजप तर हे तीन चाकी सरकार आहे. टिकणार नाही. असे म्हणून मोकळे झालेच आहे. त्या वाक्याला महाविकास आघाडी खरे उतरते कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भीमा-कोरेगाव घटनेच्या तपास प्रकरणावरून आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एसआयटी तर्फे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मा.शरद पवार यांनी केली होती. परंतु केंद्राने हा तपास पुणे पोलिसांकडून एनआयए कडे देण्याचा निर्णय घेतला. हा तपास एनआयए कडे जाऊ नये यासाठी शरद पवार सक्रीय होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास एनआयए कडे सुपूर्द करण्यासाठी मान्यताही देऊन टाकली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला अप्रत्यक्षपणे समर्थन नव्हतेच. तसेच शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर आता कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा मिडिया सोबत बोलताना ठाकरेंवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले उद्धव ठाकरेंचा हा निर्णय योग्य नसून आम्ही महाराष्ट्रात सत्ते मध्ये भागीदार आहोत, त्यामुळे आमचे मत त्यांनी जाणून घ्यायला हवे. नाहीतर या सरकार मध्ये काही कॉंग्रेस चे नेते सुद्धा आहेत ते याविरुद्ध आवाज उठवतील असा धक्कादायक इशारा सुद्धा खरगे यांनी दिला.
Tags:
Maharashtra