काळ्या रश्याच्या मटनावर मनसोक्त ताव.- काय होत्या इच्छा !
मा. राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील कामकाज आटोपून पुण्याला जात असताना अहमदनगर येथील केडगाव मध्ये एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये काळ्या रश्याच्या मटनावर मनसोक्त ताव मारला.
राज ठाकरे शनिवारी दुपारी अहमदनगर मधील केडगाव येथे एका हॉटेल मध्ये थांबणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाल्याबरोबर लगेच केडगाव परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. साधारण २.३० च्या आसपास राज ठाकरे हॉटेल मध्ये आले. त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा होते.
या सर्व टीमची एका स्वत्रंत्र रूम मध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती . यावेळी ठाकरे यांनी काळ्या रश्याच्या मटनावर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर राजसाहेब म्हणाले या हॉटेल मध्ये जेवणाची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. आज ती पूर्ण झाली.
Tags:
Maharashtra