इंदुरीकर महाराज ज्यांना देव माणूस म्हणाले त्यांच्याच मुलीने केली टीका.


इंदुरीकर महाराज ज्यांना देव माणूस म्हणाले त्यांच्याच मुलीने केली टीका.


इंदुरीकर महाराज स्वतःच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केलेल्या व्याख्यानात मा. शरद पवार यांना देवमाणूस म्हटले होते. परतू आज कीर्तनातील एका वक्तव्यामुळे इंदोरीकर हे अडचणीत सापडले असताना  पवारसाहेबांच्या मुलीनेच त्यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. 
   मा.खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मध्ये काही विकासकामाचे उद्घाटन केले. यावेळी सुप्रियाताईंनी इंदोरीकर महाराजांच्या वादावर आपली प्रतिक्रिया नोंदविली.
 मा.सुप्रियाताई म्हणाल्या कीर्तनाबाद्द्ल माझ्या मनात श्रद्धाच आहे. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण हे दुर्दैव असल्याच त्या म्हटल्या.महाराष्ट्र राज्यात अशी अंधश्रद्धा पसरवण हे आपल दुर्दैव आहे. अस भाष्य ताईंनी या वेळी केल.
Previous Post Next Post