अजित पवारांनी राउतांना फटकारल, का दर्शविली नापसंती !
गेल्या पंधरवड्या पासून राज्यभरात उर्जामंत्री नितीन राउत यांनी जनतेला १०० युनिट वीज अगदी मोफत देण्याच सांगितल होत. यासाठी त्यांनी MSEDCL कडून ३ महिन्यांचा अहवाल सुद्धा मागवला होता.
दिल्लीमध्ये ज्या प्रकारे केजरीवाल यांनी मोफत वीज दिली त्याच प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न नितीन राउत करत होते. वारंवार त्यांनी प्रसारमाध्यमाद्वारे याच्या घोषणा सुद्धा दिल्या होत्या.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन राउत यांच्या निर्णयावर नापसंती दर्शविली. त्याबाबत अजित पवार म्हणाले हा बोज्या पेलण्याची क्षमता राज्यावर नाही. तसेच मोफत विजेची सवय लोकांना लावण हे योग्य नाही. अशा प्रकारच्या घोषणा करण टाळाव असे मत अजित दादांनी व्यक्त केले.
Tags:
Maharashtra