८६ वर्षाच्या म्हाताऱ्याला मुलीची पप्पी घेणे पडले महागात.
घटनेच्या दिवशी हि पीडित मुलगी गार्डनमध्ये फिरायला गेली होती. गार्डन मध्ये या ८६ वर्षीय आरोपीने त्या मुलीचा हात धरला आणि तिचे चुंबन घेतले. पीडित मुलगी घाबरून तेथून पळून गेली. यानंतर जेव्हा girl-kissसंध्याकाळी आईबरोबर मुलगी परत गार्डन मध्ये गेली तेव्हा याच म्हाताऱ्याने परत तिचा पाठलाग केला आणि चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला. यावेळी या मुलीने आरडाओरडा केला असता तिची आई व मित्र धावत आले पण तोपर्यंत आरोपी तेथून पळून गेला होता. यानंतर लोकांनी या म्हाताऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या ८६ वर्षीय आरोपीला भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या कलम 354 आणि 354-डी अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे व त्या किशोरवयीन मुलीची छेडछाड व विनयभंग केल्याप्रकरणी 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली आहे.
Tags:
Crime