Corona-Virus - चीन मध्ये जैविक शस्त्रे बनवण्याचा प्रयत्नातून झाला कोरोना व्हायरस चा जन्म ?



Corona-Virus -  चीन मध्ये जैविक शस्त्रे बनवण्याचा प्रयत्नातून झाला कोरोना व्हायरस चा जन्म ?


        महाराष्ट्रातील शिवसेना  पक्षाच्या सामना वृत्तपत्रात  शुक्रवारी चीनवर जैविक शस्त्रे बनवण्याचा आरोप केला आहे. सामनाच्या मुखपत्रात चीनमध्ये कोरोना सारखे विषाणू का उद्भवतात असा सवालही केला आहे.


             महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाने म्हटले आहे की, अमेरिका आणि जपान बरोबर अनेक विकसित देश या नव्या कोरोना विषाणूंविरूद्ध लढत आहेत. अशा परिस्थितीत जगभरातील देशांनी एकत्र येऊन चीनमध्ये अशा प्राणघातक विषाणूंचा जन्म का होतो हे शोधून काढायला हवे. शिवसेना पक्षाच्या सामना वृत्तपत्रात  दावा केला आहे की, चीनमध्ये जैविक प्रयोगशाळा आहे जिथे करोना विषाणू आढळून आला आहे. या प्रयोगशाळेत विविध प्राण्यांवर प्रयोग केले जातात. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस चा जन्म झाला असावा व तो आता जगभर पसरत आहे.. आत्ता पर्यंत २१३ लोकांचा या विषाणू मुळे मृत्यू झाला आहे. व ९००० पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे.


Previous Post Next Post