मा. फडणवीसांनी या कारणासाठी अगदी मनापासून मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार.
एकीकडे महाविकास आघाडीमधूनच काही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. कोरेगावभीमाचा तपास NIA कडे सुपूर्द करण्यास परवानगी दिल्या मुळे मा.शरद पवार व इतर काही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. तसेच ठाकरे हे महाविकास आघाडीतील नेत्यांना न विचारता परस्पर निर्णय घेतात यामुळे सुद्धा त्यांच्याच सरकार मधून काही लोकांनी या विरोधात प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेतच.
एकीकडे मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या कोरेगावभीमाचा तपास NIA कडे सुपूर्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. व उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले आहे. फडणवीस हे नवी मुंबई येथे BJP च्या राज्य परिषदेत बोलत होते.
तसेच काही कारणांसाठी त्यांनी शिवसेनेवर टीका सुद्धा केली. फडणवीस म्हणाले जर खरच आत्मविश्वास असेल तर पुन्हा निवडणूक लढवा भाजप एकटी महाविकास आघाडीला हारवेल.
Tags:
Political