बलात्काराला विरोध करणाऱ्या त्या महिलेलाच अखेर फाशी.
आता पर्यंत असे ऐकले असेल बलात्कार करणाऱ्याला फाशी होत असते. परंतु सौदी अरेबियात याच्या विरुद्ध घडले आहे. इथे एका बलात्काराला विरोध केलेल्या महिलेलाच भर चौकात फाशी झाली. त्या महिलेनेने असा काय गुन्हा केला कि तिच्यावर हि वेळ आली.
हि महिला इंडोनेशियन नागरिक होती. कामानिमित्त सौदी मध्ये राहत होती. ऑफिस मधील कामकाज आटोपून झाल्यावर बॉस च्या रूम मध्ये गेली असता तिच्या बॉसनेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याचा कसोसीने प्रतिकार केला. शेवटी काही पर्याय शिल्लक नाही हे ध्यानात घेऊन तिने शेवटी बॉस वर हल्ला केला.
या हल्ल्यात तिचा बॉस जखमी झाला व नंतर हॉस्पिटल मध्ये त्याचा मृत्यू झाला. केवळ ह्या गुन्ह्यावरून या महिलेस फाशीची शिक्षा झाली. हि महिला एका मुलाची आई सुद्धा आहे. सौदी सरकारने महिलेला फाशीची शिक्षा देण्याआधी कोणताही निरोप इंडोनेशियातील तिच्या घरच्यांना किंवा सरकारला दिला नाही.
यावरून इंडो सरकारने सौदी सरकारला धारेवर धरले असून. सौदीने दोन राष्ट्रातील संबंध खराब केले असल्याचा आरोप इंडो सरकारने लावला आहे.
यावरून इंडो सरकारने सौदी सरकारला धारेवर धरले असून. सौदीने दोन राष्ट्रातील संबंध खराब केले असल्याचा आरोप इंडो सरकारने लावला आहे.
Tags:
Crime