इशारा- कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे...


इशारा- कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे...

इशारा- कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे...कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील चार भिंतींच्या आतली भांडणे आणखी काही मिटलेली नाहीत . वेगवेगळ्या कारणावरून सतत एकमेकांवर कुरघोडी करणे चालूच आहे. मंत्रिपद, ऑफिस इ. वरून सरकार मध्ये वाद होत असल्याचे समोर आले आहे. यावरून जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी एका कार्यक्रमात कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे.
   मा. यशवंतराव गडाख म्हणाले अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची प्रतीम खराब होत आहे. जर शिवसेनेने दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले नसते तर फक्त हातावर हात ठेऊन बसव लागल असत. यामुळे मा. उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानायला हवेत. जर नेतेमंडळी आपापसात असेच भांडत राहिले तर मुख्यमंत्री कधीही राजीनामा देऊ शकतात. यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीने लवकरच सावध व्हावे असा सक्त इशारा यशवंतराव गडाख यांनी दिला आहे.
Previous Post Next Post