१३० कोटी भारतीयांपैकी एकालाही CAA कायद्याचा त्रास होणार नाही.
१३० कोटी भारतीयांपैकी एकालाही CAA कायद्याचा त्रास होणार नाही.दिल्लीमध्ये पिटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले CAA हा कायदा देशविरोधी नाही. जर CAA मुळे देशातील एका जरी व्यक्तीला त्रास होणार असेल तर केंद्र सरकार पुन्हा या कायद्यावर विचार करेन.
परंतु जे दुसऱ्या देशातील घुसखोर आहेत त्यांच्या भल्याचा विचार केला जाणार नसल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर काही नेते घुसखोरांना नागरिकत्व देण्यात यावी अशी मागणी करत आहेत. जे नेते मंडळी या कायद्याला विरोध करत आहेत त्यांनी हा कायदा देशविरोधी कसा आहे हे सिद्ध करावे.
तसेच भारताने जर घुसखोरांना, बांगलादेशींना नागरिकत्व देण्याचे ठरवले तर निम्मा बांगलादेश स्वतःचा देश सोडून भारतात येईल. मग ह्या घुसखोरांची जबाबदारी कोण घेणार ? राहुल गांधी किंवा चंद्रशेखर राव हि जबाबदारी घेणार का असा प्रश्न सुद्धा जी.किशन रेड्डी यांनी उपस्थित केला.