असा झाला तिचा करून अंत, तुटली आयुष्याची दोरी.


असा झाला तिचा करून अंत, तुटली आयुष्याची दोरी.


नांदूर:असा झाला तिचा करून अंत, तुटली आयुष्याची दोरी. आयुष्याची दोर तुटणाऱ्या मुलीचे नाव आकांक्षा आवारे आहे. भावंडासोबत घराबाहेरील झाडाला बांधलेला झोका खेळत असताना आकांक्षाच्या गळ्याला दोरीचा फास बसला आणि तिने जागीच मृत्यूला कवटाळले. भावंडाना काही कळण्याच्या आत आकांक्षाच्या जीवनाचा दिवा विझला. घरच्यांनी ताबडतोप येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आपली मुलगी जागीच गेल्याचे पाहून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

 आकांक्षा हि ११ वर्षाची होती व ती इयत्ता ५ वी मध्ये शिकत होती. या घडलेल्या घटनेमुळे नांदूरमध्ये शोककळा पसरली आहे.

Previous Post Next Post