अजित पवारांनी टीकेवर दिले सडेतोड उत्तर !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगलीत बोलत असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी आबांना श्रद्धांजली अर्पण करून पत्रकारांसोबत चर्चा केली. यावेळी ते म्हणाले आज आबा जरी हयात नसले तरी आबांची थोर पुण्याई आणि जीवाला जीव देणारी माणसे आज आमच्यात आहेत. कदाचित त्यामुळेच BJP नेत्यांना घरी बसून रहाव लागल आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी काय टीका केली होती? सत्ता हातातून जाऊ नये या साठी अजित पवार हे भाजपच्या ८० तासांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले होते. राजकारणात आपणच पुढे रहाव यासाठी काही लोक सतत प्रयत्न करत असतात. सत्तेसाठी अजित पवार हे आपलेच वर्चस्व राहण्यासाठी प्रयत्न करत होते.
Tags:
Maharashtra