गड किल्ल्यांवर दारू पिणार्यांची खैर नाही... होऊ शकते इतकी वर्षे शिक्षा
महाराष्ट्रातील गडकिल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ताळीरामांची आता काही खैर केली जाणार नाही. असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीस ६ महिने जेल आणि १० हजार रु दंडाची शिक्षा होऊ शकते. पहिल्यांदा शिक्षा झालेली व्यक्ती परत तेच कृत्य करताना सापडली तर 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो. गड किल्यांची पवित्र्यता भंग करणारे व तळीराम यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने जरी केले आहेत.
