बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू. संपूर्ण नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत..

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू. संपूर्ण नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत..


अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून बिबट्याच्या दिसण्याच्या व हल्ल्याच्या बातम्या दररोज येत असतात. आता अहमदनगर जिल्हा बिबट्याचे जंगल झाले की काय असा प्रश्न पुढे येतो. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून बिबट्याच्या दर्शनाच्या व हल्ल्याच्या बातम्या दररोज येतच असतात. बिबट्यांना पकडण्यात प्रशासनाला येणारे अपयश म्हणावे की प्रशासनाला बिबट्याला पकडण्यासाठी मिळणाऱ्या साधनसामग्रीची कमतरता म्हणावी. 

  अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आजी बरोबर अंगणात खेळणाऱ्या या मुलीला बिबट्या उचलून उसाच्या शेतात घेऊन गेला. व याच घटनेत या मुलीचा जीव गेला .यापूर्वीही एका शाळकरी मुलीचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे.



Previous Post Next Post