भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का. या खासदाराची खासदारकी धोक्यात?
भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का या खासदाराची खासदारकी धोक्यात सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे लोकसभेचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपला राखीव मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बेडा जंगम जातीचा जो दाखला सदर केला होता. तो बोगस असल्याची तक्रारजात पडताळणी समितीकडे प्रमोद गायकवाड, विनायक तनपुरे आणि राजेंद्र मुळे यांनी केली होती.

आणि या संदर्भात जात पडताळणी समिती मध्ये सुनावणी सुरु आहेत. काल या संबंधीच एक सुनावणी झाली आणि या सुनावणी मध्ये जय सिद्धेवर स्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे एक फर्जी उतारा दाखल केला होता. तो दाखलाच बोगस असल्याची तक्रार या समितीकडे गेली होती. या मुळेच आता त्यांची खासदारकी धोक्यात येते का हा प्रश्न समोर येत आहे.
