पब्जी गेम मुळे मेंदूची नस तुटली- भयानक मृत्यू.


पुणे: पब्जी गेम मुळे एका तरुणावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही धक्कादायक घटना रावेत-देहूरोड शिंदे वस्ती मध्ये घडली आहे. हर्षल देवीदास मेमाणे  असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

Pubg Game breaks the veins of the brain
पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल गुरूवारी दुपारच्या सुमारास शिंदेवस्ती येथे घराशेजारी आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत असताना  त्याला झटके येऊ लागले. थोड्या वेळातच तो बेशुध्द पडला. त्याला ताबडतोब  खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हर्षलचा मृत्यू झाला. 
हर्षल वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की अति ताण आल्यामुळे त्याच्या मेंदूतील नस तुटली.  व यातच हर्षलचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोबाईल मध्ये कोणतीही गेम खेळताना डोळ्यांवर तसेच मेंदूवर तान येऊन अशा घटना घडू शकतात. यामुळे मोबाईल वापरताना सतत जास्त वेळ वापरू नये, अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. पोलीसांनी हर्षलच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post