अमरावती : इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय युवतीची ची पोटात चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे घडली. ही घटना एक तर्फी प्रेमातून घडली असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने आधी तिच्या पोटात चाकू भोकसला व नंतर स्वतःच्या पोटात चाकू भोकसून घेतला. या घटनेनंतर तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर आरोपीवरती ग्रामीण रुग्णालय उपचार सुरू आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.