दहिसर मुंबई: दहिसर येथील मगिरी चाळीमध्ये संजय दास हा वेश्याव्यवसाय करत असल्याचे दहिसर पोलिसांना समजताच पोलिसांनी छापा टाकून संजय दास ला अटक केली आहे. बांगलादेश व पश्चिम बंगाल इथून मुलींना फसवुन मुंबईत आणून वेश्याव्यवसा यात ढकलणाऱ्या या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील छाप्यात तीन मुलींची सुटका करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत