मुंबई: मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेला भाजपसोबत जाण्याचे सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले आहे. मनसेच्या झेंड्यामध्ये बदल करण्यात आला आहे, तसाच बदल मनसेच्या विविध धोरणांमध्ये ही केला जाईल. अशी चर्चा आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी असे सांगितले की याआधी आम्ही राष्ट्रवादीला ही मदत केली, त्याचबरोबर शिवसेना व भाजपलाही मदत केली आहे. तसेच आम्हाला कोणी कोणी मदत केली हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचबरोबर पुढे अशीही म्हटले की राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. यामुळेच भाजपा व मनसे एकत्र येऊ शकतो.