नागपूर: भाजपचा गड असणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेत फडणवीसांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेसला यश आले आहे. राज्यातील नव्या समीकरणा नुसार नागपुरात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. या निकालामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व जागांवर काँग्रेस उमेदवार विजय झाले आहे.