आपण मोबाईल चार्जिंग करण्याच्या चुका नेहमी करतो. त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते. कधीकधी बॅटरी चा स्फोट सुद्धा तुम्ही बघितला असेल, किंवा वाचलं असेल. त्याला सुद्धा चार्जिंग करतानाच्या चुकाच कारणीभूत आहेत. जरास गेम वगैरे खेळल किंवा काही केलं की मोबाईल गरम होतो. तेव्हा चार्जिंग करताना सुद्धा तो गरम होतो. त्याला ओवरहीटिंग असे म्हणतात. तर ही सुद्धा आपली चार्जिंग करण्याची चूक आहे
mobile charging mistakes
१) चार्जिंगला जेंव्हा तुम्ही मोबाईल लावाल त्यावेळी मोबाईलचे कव्हर काढून ठेवा. असं का करायचं? याचं कारण हे जे कव्हर असतं हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा रोखत. बॅटरीला हवा मिळत नाही. आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो. मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरी वरची त्याचा खूपच निगेटिव इफेक्ट पडतो. आणि बॅटरी लवकर खराब होते. मोबाईलला कव्हर अवश्य वापरावा. कवर मोबाईलची गरज आहे. परंतु मोबाईल चार्जिंग करताना कव्हर काढून ठेवावा.
2) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने दिलेला चार्जर मोबाईल चार्जिंग करताना वापरावा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागला तर तुमची बॅटरी लवकर खराब होते. मोबाईलचा चार्जर नुसार मोबाईलला किती करंट पाठवायचा हे ठरलेलं असतं. त्यामुळे मोबाइल चार्जिंग करताना दुसरा चार्जर वापरू नये.
३) आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल चार्जिंग करताना नेहमी स्विच ऑफ करावा. जर स्विच ऑफ करणे शक्य नसेल तर तो फ्लाईट मोडवर टाकावा. यामुळे मोबाईल गरम होणार नाही व बॅटरी दीर्घकाळ टिकेल. आपल्या मोबाईलची व मोबाईलची बॅटरी ची हवी तशी काळजी न घेतल्यास मोबाईलचा स्फोट होण्याची ची दाट शक्यता असते. मोबाईलच्या बाबतीत निष्काळजीपणा असल्यामुळे बऱ्याचश्या लोकांचा मोबाईलचा स्फोट होऊन जीवही गमवावा लागला आहे.
Tags:
Technology