मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच वस्तू कुणाला देऊ नका

   
15 जानेवारी 2020 रोजी मकरसंक्रांतीचा सण आलेला आहे. आणि मकर संक्रांत म्हटलं की जपतप ध्यान-  या गोष्टींचं महत्त्व कितीतरी पटीने वाटतं. या दिवशी आपण जे काही दान करू जे काही ज्योतिषी उपाय करू त्यांची कितीतरी पट जास्त फळ आपल्याला प्राप्त होत असतात. मात्र त्याचबरोबरीने या दिवशी तर आपल्या हातून काही चुका झाल्या तर मात्र त्याची गंभीर अशा प्रकारची शिक्षा आपल्याला मिळू शकते. 
आणि पुढच्या पाच वस्तू सांगणार आहोत या पाच वस्तु आपण एखाद्याला दान म्हणून दिल्या किंवा एखाद्याने मागितले आणि तुम्ही तर त्याला दिल्या, तर तुमच्या घरा मध्ये माता लक्ष्मी टीकणार नाही. आणि मग घरामध्ये गरीबी येईल. घरामध्ये पैसा टिकण्याची सुतराम शक्‍यता राहणार नाही. मकर संक्रांति म्हणजेच सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात, संक्रमण करतात तो दिवस. मकरसंक्रांतीचे महत्त्व फार मोठ आहे. कारण याच दिवसापासून उत्तरायण या परवास सुरुवात होते. मित्रांनो उत्तरायण म्हणजे काय तर दक्षिणायना मध्ये सर्व देवी देवता या निद्रिस्त असतात. झोपलेल्या अवस्थेत असतात. मात्र उतरायना पासून सर्व देवी देवता जागृत होतात. जेव्हा सर्व देवी देवता जागृत होतात त्या काळामध्ये आपण जी काही पुण्यकर्म करू त्यांचे कितीतरी पट जास्त फळं आपणास प्राप्त होत असतात. मकर संक्रांत हा या उत्तरायणाचा पहिला दिवस आहे. आणि म्हणून या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला काही वस्तू दान केल्या तर तर याचं पुण्य तुम्हाला मिळतं. 
या पाच वस्तूंचे दान आपण चुकूनही करू नये. 
makar sankrantichya divsi ya pach vastu kunalahi deu naka

या पाच वस्तू कोणत्या आहेत 
१) पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील साडू होय. आपण आपल्या घरातील झाडूला लक्ष्मी मानतो. हिंदू धर्मशास्त्रात आपल्या घरातील झाडू म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच स्वरूप आहे. आणि म्हणून आपण दिवाळी असो किंवा इतर अनेक प्रसंगी या झाडूची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो. जर आपण आपल्या घरातील झाडू कोणालाही दिला असेल तरीसुद्धा आपल्या घरातील धनलक्ष्मी पैसा ही दुसऱ्या घरा मध्ये जाते. आपण झाडू कोणालाही वापरायला देऊ नये. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तर आपण बाडू कदापिही देऊ नये.  बरीच जन असं करतात की झाडूचं मंदिरांमध्ये दान करतात.  झाडू मंदिरात दान केल्याने आपलं भाग्य आपलं नशीब प्रबळ बनतो. ही गोष्ट खरी आहे. मात्र त्यासाठी काही विशिष्ट प्रसंग असावे लागतात. आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या झाडूचं दान कोणत्याही परिस्थितीत मंदिरात सुद्धा करू नये.
2)  जे मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचा दान करतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती असते.  शनीचा दोष, शनीची साडेसाती आहे असे लोक या दिवशी तेलाचा दान करतात. अगदी बरोबर आहे ते केल्याने तुमच्या मागची शनीची साडेसाती नक्कीच दूर होईल. मात्र  एक गोष्ट महत्त्वाची आपण जे तेल दान करत आहोत हे करताना तेल वापरलेलं नसावं. बरेच जण घरगुती उरलेलं तेल दान म्हणून देतात. जेणेकरून बचतही होईल आणि पुण्य सुद्धा मिळेल. मात्र अशा प्रकारची चूक करू नका यामुळे शनीची पीडा दूर होण्यापेक्षा ती अधिक वाढेल.आणि  ज्या घरांमध्ये शनीचा दोष असतो त्या घरांमध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही. आणि म्हणून ही चूक आपण कदापिही करू नका.
३) तिसरी गोष्ट धारदार वस्तू कोणत्याही शुभप्रसंगी या वस्तूंचा वापर आपण टाळायला हवा. कोणत्याही परिस्थितीत धारदार वस्तूंचे दान आपण करू नये. किंवा कुणालाही देऊ नयेत. त्यामुळे धारदार टोकदार वस्तू आहेत यांचं दान हे हिंदू धर्माने निषेधार्ह मांडण्यात आलेला आहे. 
४) गरीब व्यक्तींना कींवा आपल्या घरी काम करणारी कामगार असेल तर त्याना कोणत्याही प्रकारचे जुने कपडे दान म्हणून देतात. मकर संक्रांतीच्या दिवशी जुन्या कपड्यांचा चुकूनही दान करू नका. कारण यामुळे अनेक दोष आपल्या मागे लागू शकतात. ज्या व्यक्तीच्या आपण दिलेले आहेत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे भविष्यामध्ये घर करू शकतात.
५) प्लास्टिकची भांडी आणि स्टीलची भांडी  हे दोन धातू सुद्धा दान करू नका. खर तर प्लॅस्टिक धातु नाही. हे दोन पदार्थ आहेत. प्लॅस्टिक चे चुकूनही दान करू नका .  हिंदू धर्मशास्त्र ने  पितळ व तांबे या धातूंच्या दानाला मान्यता दिलेली आहे. मात्र स्टीलच्या वस्तू आणि त्याच्या प्लास्टिकच्या वस्तू ह्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवतात. स्टील त्यातली त्यात ठीक आहे. मात्र प्लॅस्टीकची भांडी असतात त्याच्यातून नकारात्मक किरण बाहेर पडतात. आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या भाग्यावर होत असतो.

Post a Comment

Previous Post Next Post