स्मशान भूमी जवळ राहून सुद्धा आम्ही कार्य करू - बच्चू कडू

बच्चू कडू झाले नाराज

bachhu kadu latest news.png         मुंबई: खातेवाटपाआधी  मंत्र्यांना शासकीय राहण्यासाठी जागा व दालनाचे वाटप करण्यात आले, परंतु बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या जागेची नापसंती दर्शवत त्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी अपंग आणि रुग्ण यांना सहज भेटता यावे यासाठी मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि शेजारील निवस्थानाची मागणी केली होती.
कितीही बिकट परिस्थितीत चांगल काम करण्याची तयारी  दर्शवत ते म्हणाले, "निवास्थान कुठ आहे, हेमामालिनीच्या घराजवळ आहे कि समुद्राजवळ त्याच काही घेण देन नाही, जिथ जागा भेटन तिथ कार्य करू"
परंतु जाणीव पूर्वक काही अधिकार्यांनी विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येथील स्मशाना जवळील रॉकी हिल फ्लॅॅट दिला.ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला

Post a Comment

Previous Post Next Post