महाराष्ट्र: कोंग्रेसचे विजय वडेट्टीवार सध्या आपल्या पक्षावर नाराज आहेत. आणि मुंबई च्या आपल्या बंगल्यात दारे, खिडक्या लावून त्यांनी स्वतःला कैद करून घेतल आहे. विजय वडेट्टीवार यांना संपूर्ण महाराष्ट्रातून भेटायला येणारे कार्यकर्ते, वेगवेगळे पदाधिकारी याच बंगल्यावर येत असतात. परंतु आज सकाळपासून या सरकारी बंगल्याची दारं-खिडक्या बंद असल्याने सर्वामध्ये गोंधळाची स्थिती तयार झाली आहे. गेले काही दिवसा पासून वडेट्टीवार दूरध्वनी वरही उपलब्ध झाले नाहीत. विजय वडेट्टीवार यांची नाराजगी काय आहे हे जाणून घेऊ.
वडेट्टीवार यांना इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास आणि पुनर्वसन खाती मिळाली आहेत. तर वडेट्टीवार यांचे असे म्हणणे आहे की आपल्याला कमी दर्जाची खाती मिळाली आहे. यातील एका खात्यात तर फक्त चारच अधिकारी कामाला आहे. उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांना मातब्बर खाती देण्यात आली आहे. वडेट्टीवार यांना मात्र वजन नसलेली खाती देण्यात आली असल्याने वडेट्टीवार आपल्याच पक्षावर नाराज आहे.