कोल्हापूर: कोणत्या ना कोणत्या वादावरून कायमच राजकीय लोकांना चोप दिल्याच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेत राडा झाला आहे.
महानगरपालिकेत झालेल्या वादातून एम आय एम पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला चांगला चोप दिल्याची घटना घडली आहे. एम आय एम चे पदाधिकारी शाहिद शेख यांना चोप देण्यात आलेला आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या कारणावरून हा राडा कोल्हापूर महानगरपालिकेत घडला आहे. या घटनेने कोल्हापूर महानगरपालिकेत चांगलेच तणावाचे वातावरण तयार झाले.