मा. अजित दादा पवार यांच्यावर बारामतीमध्ये हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी


बारामती: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर बारामती येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून कार्यकर्ते व दादांचे चाहते खूपच उत्साही व आनंदी आहेत. 
      "एकच वादा अजित दादा"  या घोषणांनी  बारामती  दुमदुमली. अजित दादां सोबत  या कार्यक्रमासाठी  त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार  हेसुद्धा  उपस्थित  होते. सत्कार समारंभानंतर  बारामती मध्ये जोरदार असे शक्तिप्रदर्शन  करण्यात आले. 
       तर परळी मध्ये धनंजय मुंडे यांच्या सत्कारासाठी सातशे किलो वजनाचा फुलांचा हार आणण्यात आला आहे. माननीय धनंजय मुंडे यांचे कार्यकर्तेही व चाहते प्रचंड उत्साही आहेत. 
Previous Post Next Post