मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोने सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं. दिपीकाचा चित्रपट छपाक रसिकांच्या भेटीला आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर दीपिका पदुकोण ईश्वरचरणी आली आहे.
याआधीही ही आयुष्याच्या महत्वाच्या दिवशी दीपीका पदुकोण ईश्वरचरणी आलेली होती.

ॲसिड हल्ला ग्रस्त लक्ष्मी अग्रवाल ची भूमिका दीपिका या सिनेमांमध्ये साकारत आहे. यापूर्वी दीपिकानं जे एन यु मध्ये लावलेल्या हजेरीमुळे दीपिकाची जोरदार टीका होऊन तिच्या छपाक या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी सोशल मीडिया वरती जोर धरत होती. आजच प्रदर्शित झालेला चित्रपट छपाक रसिकांना चांगलाच आवडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर दीपिकाने सिद्धिविनायकाची दर्शन घेऊन पूजा केली.