
kaifi aazami jivan charitra
तरुण होईपर्यंत ते वेगवेगळ्या संमेलनांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये सामील होऊ लागले. त्यांना धार्मिकपणा आवडत नसल्याने त्यांनी समाजाच्या हितासाठी काम करण्याचे ठरवले. व समाजासाठी कविता लिहिण्याचे काम सुरू केले. 1943 मध्ये त्यांच्या साम्यवादी संघटनेने मुंबईमध्ये कार्यालय सुरू केले. व पुढे मे 1947 मध्ये त्यांचा विवाह शौकत नावाच्या मुलीशी झाला. आर्थिक दृष्टीने श्रीमंत असणारी व साहित्याची आवड असणारी शौकत हि कैफी आझमी यांच्या लिखाणामुळे त्यांच्यावर नेहमीच प्रभावीत होती.
या दोघांचे पोटी पुढे मुलगा व मुलगी यांनी जन्म घेतला. यांच्या मुलांची नावे हे शबाना व बाबा अशी आहेत. पुढे शबाना हि अभिनेत्री बनली. कैफी आझमी यांनी हिंदी चित्रपटासाठी खूप गाणी लिहिली. एका पेक्षा एक भारी गाणी यांनी चित्रपटांसाठी दिली. 10 मे 2002 मध्ये कैफी आजमी यांचे निधन झाले. 1974 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.