बेकायदा पार्किंगसाठी आकारला जाणार एवढा दंड-मुंबई

how much fine for illegal parking in mumbai 2020.png
how much fine for illegal parking in mumbai 2020
मुंबई- सध्याच्या काळात अधिकचा वाढणारा वाहनांचा वापर त्यामुळे विविध वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अशी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी तसेच बेकायदेशीर पार्किंगवर निर्बंध घालण्यासाठी विविध दंडात्मक कारवाई केली आहे. पालिका प्रशासनाने 7 जुलै 2019 पासून दंडात्मक कारवाई सुरू केली.
           मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीत मुंबई वाहतूक प्राधिकरणाच्या सदस्यांनीही दंडाची रक्कम कपात करण्याची सूचना केली होती, त्यानुसार बेकायदेशीर पार्किंगची दंडाची सुधारित रक्कम चार हजार रुपये असणार आहे.
         बेकायदेशीर पार्किंग वर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येत होता यावर मुंबई वाचू प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर या दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक पार्किंगच्या पाचशे मीटर परिसरात बेकायदेशीर वाहने उभे केल्यास चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केलेल्या पाच रस्त्यांवरील दंडाची रक्कम आठ हजार रुपये असणार आहे.
याबाबतची अधिक ची माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे.

Post a Comment

Previous Post Next Post