महाराष्ट्र: बुधवारी पहाटे आलेल्या पावसामुळे वाघोली, धामणगाव, सावरखेड पिंगळाई, काटपुर, शिरखेड, नेरपिंगळाई या गावांना मोठ्या प्रमाणात गारपिटीचा फटका बसला आहे. बोराएवढी गार पडल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, तूर, हरभरा, गहू, कांदा तसेच फळबागांना गारपिटीचा फटका बसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरित नुकसानीची पाहणी करून या आपदाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तावरणातील या बदलामुळे कधी पाऊस ,कधी गारपीट तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. कोणतेच पीक पदरी पडत नसल्याने निराश वादी शेतकऱ्याचे शासनाच्या मदतीकडे लक्ष लागून राहिले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना हवी तेवढी नुसकान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या मदती कडे लक्ष देणे म्हणजे पदरी निराशा पाडून घेणेच होय.