आपल्या मुलांना या चांगल्या सवयी लावाच

चांगल्या सवयींचे फायदे:

              आपण आपल्या मुलांना चांगली सवय लावायला हवी ती म्हणजे सकाळी लवकर उठणे. अनेक जणांच्या घरांमध्ये त्यांची मुलंही उशिरापर्यंत झोपतात. अगदी सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत झोपणारी ही मुलं पुढं जाऊन कधीही लवकर उठू शकत नाहीत. सकाळी लवकर उठल्यामुळे मुलं तणावमुक्त राहतात. त्यांना पूर्ण दिवस अगदी ताजगीपूर्ण, फ्रेश असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं महत्त्वाचं असतं. व्यायामासाठी वेळ सुद्धा या मुलांना सकाळी लवकर उठल्यामुळे मिळतो.
                       दुसरी सवय फार महत्त्वाची आहे,ती म्हणजे आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर देवाची पूजा मुलांनी करायला हवी. तर आपण देखील देवपूजा करत असाल तर आपल्या मुलांना सुद्धा आपल्याजवळ बसवा. देव पूजा केल्याने मन मेंदू शांत होत असतो. त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकते. पूजा केल्याने एकाग्रता वाढते, सकारात्मक ऊर्जा मिळाली तर आपल्या मुलाचं भविष्य हे उज्ज्वल होईल यामध्ये शंका नाही. पुढची चांगली सवय आहे ती म्हणजे देवाचे दर्शन घेतल्यानंतर देव पूजा केल्यानंतर आपल्या मुलांना आई-वडील आणि घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद द्यायला सांगावे. ही सवय सर्व मुलांना लावायला हवी. हल्ली मूलं मोठ्यांचा आदर करत नाही. ही सवय लावली तर एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व वाढेल.
                        पुढची सवय म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुणे. अनेकदा घाई घाई मध्ये  अनेक मुले जेवणापूर्वी हात स्वच्छ करत नाही. परिणामी त्यांना  अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  म्हणजेच काविळ, पोटामध्ये जंत होणे इत्यादी आजार होतात. ही सवय लहानपणीच लावली लावली तर आयुष्यभर टिकून राहते. तसेच अनेक आजारांपासून आपल्या मुलांचा बचाव होऊ शकतो. तसेच खुर्चीवर बसून जेवल्याने अपचन, गॅसेस इत्यादी पोटाचे विकार होतात. हे विकार होऊ द्यायचे नसतील तर आणि जर आपल्या मुलांच्या शरीराची वाढ वाढवायची असेल तर जमिनीवर बसून जेवण्याची सवय आपल्या मुलांना लावायला पाहिजे. 
Previous Post Next Post