महाराष्ट्र: बीजेपी पार्टीचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव "आजचे शिवाजी नरेंद्र मोदी" असे अस्ल्यामुळे संपूर्ण देशभरातून वाद निर्माण झाला आहे.
सर्वात पहिल्यांदा शिवसेनेने यावरती आक्षेप नोंदविला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका ट्विट वर म्हटले आहे की या पुस्तकाने महाराष्ट्रातील मराठी माणूस तसेच छत्रपतींचा अपमान केला आहे.
shivaji maharajanchi tulana modi barobar
या वादग्रस्त पुस्तकावरून कोणाच्या काय प्रतिक्रिया
- महाराजांची कोणाची तुलना होऊ शकत नाही. असे वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहे.
- या वादग्रस्त पुस्तकावरून उदयनराजे सुद्धा आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करतील.
- दैनिक सामना ने सुद्धा भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला. या पुस्तकाची भाजपचा संबंध नाही तर मग पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भाजपचे नेते उपस्थित कस काय? असा प्रश्न दैनिक सामनातून मांडण्यात आला.
- मुक्ताईनगर मध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने पुस्तक मागे घेण्यात येणाऱ्या यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचे मराठा समाजाने सांगितले आहे.
- हिंगोली मध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन जय भगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे.
- सोलापूर देखील जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- जालन्यात देखील शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरवर जोडे मारून आंदोलन केले.
- त्याचबरोबर ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.